Sunday, May 5, 2024
Homeराजकीयभारताचा नंबर कधी?, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना सवाल

भारताचा नंबर कधी?, राहुल गांधींचा नरेंद्र मोदींना सवाल

दिल्ली l Delhi

चीन, अमेरिका, ब्रिटन आणि रशिया या देशांनी करोना लसीकरणाला सुरुवात केली आहे. अनेकांना ही लस देण्यातही आली आहे. भारतात पुढील महिन्यांत लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात करोनाच्या संसर्गाचा फटकाही अधिक बसला आहे. या पार्श्वभूमीवर भारतात लस कधी उपलब्ध होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधानांना सवाल केला आहे. “जगभरातील २३ लाख लोकांना कोविडचे लसीकरणही उपलब्ध झाले आहे. चीन, अमेरिका, युके, रशिया या देशांनी लसीकरणाला सुरुवातही केली आहे. भारताचा नंबर कधी येणार मोदीजी?” असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

रिपोर्टनुसार भारतात कोरोनाच्या ९ लसी चाचणीच्या अंतिम टप्प्यात आहे. लस बनवणाऱ्या कंपन्यांनी लसीची आपात्कालीन वापरासाठीी परवानगीही सरकारकडून मागिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी रविवारी सांगितले की भारतात लसीकरणाच्या अभियानाची सुरूवात जानेवारी महिन्यापासून केली जाऊ शकते. भारतात पहिल्या टप्प्यात ३० कोटी लोकांना लस देण्याची योजना आहे. यात सगळ्यात आधी लस ५० वर्षांवरील व्यक्ती, आरोग्य कर्मचारी, सुरक्षा कर्मचारीसह जोखीम असलेल्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दिली जाईल.

ऑक्सफर्ड विकसित करत असलेली लस विकसनशील देशांसाठी जास्त फायद्याची आहे. कारण याला सहजपणे सुरक्षित ठेवले जाऊ शकते. याची वाहतूक करणंही सोप आहे. उष्ण देशांमध्येही या लसीची सहजरित्या साठवण करता येऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या