उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांचा राजीनामा; कोण होणार नवे मुख्यमंत्री?

'या' दोन नेत्यांची नावे चर्चेत
तीर्थ सिंह रावत
तीर्थ सिंह रावतCourtesy : Facebook/Tirath Singh Rawat

दिल्ली l Delhi

अवघ्या चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्रिपदावर नियुक्त झालेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत (Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat) यांनी नाट्यमय घडामोडींदरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (resigns) राज्यपाल बेबी रानी मोर्या (Governor Baby Rani Maurya) यांच्याकडे दिला. शुक्रवारी पक्षनेतृत्वाने रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले.

दरम्यान पुढील वर्षी उत्तराखंडमध्ये विधानसभेची निवडणूक (Uttarakhand Assembly Election) होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रावत यांचा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे. नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी शनिवारी दुपारी चार वाजता भाजप आमदारांची बैठक होईल. यात केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Union Agriculture Minister Narendra Singh Tomar) हे निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित राहतील. या बैठकीत राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन मुख्यमंत्र्यांची निवड राज्यातील आमदारांमधून केली जाईल. उत्तराखंडमध्ये केवळ अनुभवी चेहऱ्यांचीच निवड होण्याची शक्यता आहे. तसे आदेश देण्यात येईल, असे भाजपचे (BJP) सूत्रांचे म्हणणे आहे. असे केल्याने यावेळी भाजपचे नेतृत्व उत्तराखंडलाही चकित करु शकते. मुख्यमंत्री पदासाठी दोन नावांची चर्चा आहे. सतपाल सिंह (Satpal Singh) आणि धनसिंह रावत (Dhan Singh Rawat) या दोन नावांची चर्चा आघाडीवर आहेत. सतपालसिंह यांची गणना राज्यातील बड्या नेत्यांमध्ये केली जाते, तर धनसिंह यांचे नाव गेल्या वेळीही चर्चेत आले होते.

का दिला राजीनामा?

घटनात्मक पेच निर्माण होत असल्यामुळे उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा दिला. संविधानातील तरतुदीनुसार मुख्यमंत्री अथवा मंत्रीमंडळाचा सदस्य असलेल्या व्यक्तीला सहा महिन्यांच्या आत राज्यातील सभागृहाचे सदस्य होण्याचे बंधन असते. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर तीरथ सिंह रावत मुख्यमंत्री झाले. उत्तराखंडच्या पौडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेले तीरथ सिंह रावत यांनी १० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नियमानुसार त्यांना १० सप्टेंबरपर्यंत विधानसभेची निवडणूक जिंकणे आवश्यक होते. पण राज्यात वर्षाच्या आत विधानसभेची निवडणूक आहे, यामुळे निवडणूक आयोग कोणतीही पोटनिवडणूक घेणार नाही. पोटनिवडणूक होणार नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घटनात्मक पेच निर्माण होत असल्याचे पाहून पदाचा राजीनामा सादर केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com