नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज जिल्ह्यात

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आज जिल्ह्यात
नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे उद्या शनिवार 10 जुलै रोजी जिल्हा दौर्‍यावर येत आहे. भडगाव व पाचोरा तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमीपूजनासह लोकार्पण सोहळा ना. शिंदे यांच्या उपस्थित केला जाणार आहे.

सकाळी 11 वाजता मुबंई विमानतळ येथून खाजगी विमानाने जळगावकडे ते येणार असून दुपारी 12 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी सात्वंन भेट घेवून ते दुपारी 1 वाजेच्या सुमारास महापालिकेला भेट देवून त्याठिकाणावरील आढावा घेणार आहेत.

दुपारी 1 वाजता जळगाव येथून शिरसोली-वावडदा-सामनेर-नांद्रा मार्गे पाचोरा शहरात आमदार किशोर पाटील यांच्या घरी आगमन होणार आह. त्यानंतर भडगाव शहराकडे प्रयाण व दुपारी 2 वाजता भडगाव नगरपरिषदेने नवीन बांधलेल्या कै. शेठ बक्तावरमल चोरडीया अभ्यासिकेचा लोकार्पण सोहळा ना. शिंदे यांच्या हस्ते केला जाणार आहे.

तसेच भडगाव नगरपरिषदेने नवीन बांधलेल्या घनकचरा व्यवस्थापन व प्रक्रिया प्रकल्प (डपिंग ग्राऊंड) लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजच्या सुमारास पाचोरा शहरातील महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा तर त्यानंतर शहरातील कृष्णापुरी येथील हिवरा नदीवर बांधण्यात आलेल्या तीन पुलांचा भूमीपूजन ना. शिंदे यांच्या हस्ते केला जाणार आहे.

दुपारी 4 वाजता पाचोरा येथील माजी मंत्री स्व. के. एम. बापू पाटील व्यापारी संकुल, भाजीमंडई लोकार्पण सोहळा. त्यानंतर जळगाव येथे आगमन होवून खासगी विमानाने प्रयाण करणार आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com