Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याVIDEO : निवडणूक प्रचारादरम्यान अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी आले आमने-सामने, आणि...

VIDEO : निवडणूक प्रचारादरम्यान अखिलेश यादव आणि प्रियंका गांधी आले आमने-सामने, आणि मग…

दिल्ली | Delhi

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची (Uttar Pradesh Assembly Election 2022) सर्व राजकीय पक्षांची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून सत्ताधारी आणि विरोधक ऐकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप करत असल्याचे चित्र दिसत आहे. अशातच बुलंदशहरामध्ये (Bulandshahr) कौतुकास्पद राजकीय उदाहरण दिसून आले आहे आणि त्याला निमित्त ठरली अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांची प्रचार रॅली…

- Advertisement -

‘डिजिटल’ आणि ‘क्रिप्टो’करन्सीमधील फरक काय?, वाचा…

बुलंदशहर मध्ये काल (गुरूवार) समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांची प्रचार रॅली होती. प्रियंका गांधी एका गाडीवरून नागरिकांना अभिवादन करत होत्या. त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्तेही होते. दरम्यान समोरून अखिलेश यादव यांच्यासह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी आली.

दोन्ही पक्षांची प्रचार रॅली एकमेकांसमोर आल्याने कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास सुरूवात केली. प्रियंका यांनी हात दाखवत अखिलेश यांना अभिवादन केले, तर बसमध्ये असलेल्या अखिलेश आणि जयंत चौधरी यांनी देखील अभिवादन केले. त्यानंतर अखिलेश यांनी बसवर चढून प्रियंका गांधींना दाद दिली. यावेळी दोन्ही नेत्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते. तर कार्यकर्त्यांनी हात हलवत घोषणाबाजी करून आनंद व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

आज Facebook चा वाढदिवस : फेसबुकबद्दल ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

दरम्यान यांनतर अखिलेश यादव यांनी ‘एक दुआ-सलाम, तहज़ीब के नाम’ असे ट्विट केले.

तर प्रियंका गांधी यांनी देखील ‘हमारी भी आपको राम राम’ म्हणत ट्विट केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या