Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया

दिल्ली । Delhi

केंद्रीयमंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे नेता रामविलास पासवान यांच्या हृदयात गुंतागुंत झाल्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. शस्त्रक्रिया झाली असली तरी पुढील काही काळ रामविलास पासवान डॉक्टरांच्या देखरेखीत असतील. पासवानांचे चिरंजीव आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ही माहिती दिली. हृदयविकाराचा त्रास असल्यामुळे पासवान यांची ऑगस्ट महिन्यात दिल्लीच्या फोर्टीस एस्कॉर्ट हॉस्पिटलमध्ये तपासणी झाली होती.

- Advertisement -

चिराग पासवान यांनी ट्विट करत म्हंटले आहे की “गेल्या काही दिवसांपासून माझ्या वडिलांवर उपचार सुरू आहेत. काल सायंकाळी त्यांची प्रकृती अधिक ढासळल्यामुळे रात्री उशीरा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली. गरज पडल्यास येत्या काही आठवड्यांमध्ये पुन्हा एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या अडचणीच्या काळात माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत उभे राहिल्याबद्दल सर्वांचे आभार.”

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वीच एनडीएत फूट पडली आहे. पासवानांच्या लोक जनशक्ती पार्टीने नितीश कुमार यांचे नेतृत्व नाकारत या निवडणुकीत स्वबळार लढणार आहे. मात्र, गरज पडल्यास भाजपाबरोबर काम करण्याची तयारी असल्याचेही सांगितले आहे. रविवारी दिल्लीत पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय लोक जनशक्ती पार्टीकडून घेण्यात आला आहे. या बैठीकीतून बाहेर पडल्यानंतर लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी माध्यमांना व्हिक्टरीचे चिन्ह दाखवत, स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याचे दर्शवले. राष्ट्रीय पातळीवर लोकसभा निवडणुकीत भाजपा व लोक जनशक्ती पार्टीचे भक्कम युती आहे. राजकीय स्तरावर व विधानसभा निवडणुकीत आघाडीतील जनता दल यूनायटेडशी वैचारिक मतभेद असल्याने बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे लोक जनशक्ती पार्टीकडून सांगण्यात आले आहे. याचबरोबर निकालानंतर लोक जनशक्ती पार्टीचे विजयी झालेले आमदार पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या मार्गाबरोबर राहून भाजपा-लोजपा सरकार बनवतील. असं देखील लोक जनशक्ती पार्टीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये होणार असून 10 नोव्हेंबर रोजी निकाल घोषित केला जाईल. करोना संकटकाळात देशात होणारी ही पहिली निवडणूक आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या