Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेने 'असंगाशी संग' करत...; रावसाहेब दानवेंची तुफान फटकेबाजी

शिवसेनेने ‘असंगाशी संग’ करत…; रावसाहेब दानवेंची तुफान फटकेबाजी

वैजापूर l प्रतिनिधी

२०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या शिवसेनेने बेईनामी केली. ‘असंगाशी संग’ करत परिवारवादी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसशी संधान साधल्याने आज राज्यात अमर अकबर अंथोनीचे सरकार अस्तित्वात आले आहे. मागील अडीच वर्षांत या सरकारने सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही. अशी टिका केंद्रिय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी वैजापूर येथे आयोजित जाहीर सभेत केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारने गरीबांच्या कल्याणासाठी अजेंडा राबवला आहे असे ते म्हणाले.

- Advertisement -

येथील ह्रदयरोगतज्ञ डॉ. राजीव डोंगरे यांच्या भाजपातील प्रवेश सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मेळाव्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाला केंद्रिय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, प्रदेश कार्यकारणिचे सदस्य एकनाथ जाधव, प्रदेश सचिव इद्रिस मुलतानी, भाजपाचे जिल्हा सरचिटणिस डॉ. दिनेश परदेशी, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, सुनिल पैठणपगारे. डॉ. एस.एम. जोशी, अल्पसंख्यांक आघाडीचे नबी पटेल, कैलास पवार, मोहन आहेर, ज्ञानेश्वर जगताप, कल्याण गायकवाड, सुनील मीरकर, जिल्हा परिषद सदस्य मधुकर वालतुरे उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. डोंगरे यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळपास चारशे कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. डॉ. भागवत कराड व रावसाहेब दानवे यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी बोलतांना दानवे यांनी विनोदी शैलीत तुफान फटकेबाजी करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. २०१४ मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील संपुर्ण वातावरण बदलले आहे. मागील दोन वर्षापासुन दोन रुपये किलो गहु व तीन रुपये किलो तांदुळ याशिवाय प्रत्येक महिन्याला मोफत पाच किलो धान्य देऊन गरीबांच्या कल्याणासाठी अजेंडा राबवला आहे. महाविकास आघाडी सरकार मराठा, धनगर आरक्षण देऊन शकले नाही. शेतकऱ्यांवर अन्याय करणारे या सरकारचे धोरण आहे अशी टिका त्यांनी केली.

रेल्वेशी संबंधित प्रश्न सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. राज्यातील सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या काळात असलेल्या मराठवाडा वाटर ग्रीड, ईगतपुरीचे वाहुन जाणारे १६८ टीएमसी पाणी गोदावरी पात्रात सोडण्याची महत्वाकांक्षी योजनांना स्थगिती दिली.असे डॉ. कराड म्हणाले. डॉ. राजीव डोंगरे यांनी तालुक्यातील सिंचनाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याची मागणी प्रास्ताविकात केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कैलास पवार यांनी केले‌. नगरसेवक दशरथ बनकर, दिनेश राजपूत, प्रभाकर गुंजाळ, डॉ.एस.के.पाटील, शैलेश चव्हाण, सुरेश तांबे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दानवेंचा बुट हरवला !

कार्यक्रम सुरु असतांना स्टेजवर बसलेले केंद्रिय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांचा बुट गायब झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे बुट शोधण्यासाठी स्टेजवरील मान्यवरांसह कार्यकर्त्यांची एकच धांदल उडाली. आसनाखाली, फुलांच्या हाराखाली सगळीकडे शोधाशोध झाली.पण बुट काही सापडेना. अखेर हा बुट स्टेजवरील मागील रांगेतील आसनाखाली सापडला. तेव्हा सगळ्यांनी निःश्वास सोडला.

- Advertisment -

ताज्या बातम्या