गडकरींना होती काँग्रेस प्रवेशाची ऑफर

गडकरींना होती काँग्रेस प्रवेशाची ऑफर
Nitin Gadkari

जयपूर (Jaypur)

एकेकाळी काँग्रेस (Congress) प्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी केला आहे. हा विषय चर्चेत आहे.

राजस्थान विधानसभेत (Rajasthan Legislative Assembly) आयोजित एका परिसंवादात गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी एक किस्सा सांगीतला. नागपूरमधील काँग्रेसचे (Nagpur Congress) नेते डॉक्टर श्रीकांत जिचकार माझे चांगले मित्र होते. जेव्हा मी निवडणूक हारलो होतो, तेव्हा भाजपाची (BJP) स्थिती आज आहे तशी नव्हती. त्यावेळी त्यांनी मला तुम्ही चांगले आहात, पण तुमच्या पक्षाचं भवितव्य नाही. काँग्रेसमध्ये या असं सांगितलं होतं. त्यावेळी मी नम्रपणे नकार दिला होता. चढ-उतार येत असतात, पण आपण आपल्या विचारधारेशी निष्ठा राखली पाहिजे, असं यावेळी त्यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, मला एका पत्रकाराने तुम्ही इतक्या मजेत कसे राहू शकता अस विचारलं होतं. मी सांगितलं, मी भविष्याची चिंता करत नाही. जो भविष्याची चिंता करत नाही, तो आनंदी राहतो. गडकरींना यावेळी सांगितलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना वॉटरगेट प्रकरणानंतर पद सोडावं लागलं होतं. निक्सन यांनी व्यक्ती पराभव झाल्याने नव्हे तर लढा न दिल्याने संपते असं लिहिलं होतं. आपल्याला आयुष्यात लढायचं आहे. कधी कधी आपण सत्तेत असतो, तर कधी विरोधी पक्षात असतो. हे सुरुच असतं. जे जास्त वेळ विरोधी पक्षात असतात ते सत्तेत येऊनही विरोधी पक्षाप्रमाणे वागतात. आणि जे जास्त काळ सत्तेत असतात ते विरोधी पक्षात जाऊनही सत्तेत असल्याप्रमाणे वागतात, असा टोला त्यांनी लगावला.

मुख्यमंत्रीही दुःखी

राजकारणात प्रत्येकजण दुःखी आहे. आमदार मंत्री होऊ शकले नाहीत म्हणून दु:खी आहेत. मंत्री झाले तर चांगले खात मिळालं नाही. म्हणून दुःखी आहेत. ज्या मंत्र्यांना चांगलं खातं मिळालं ते मुख्यमंत्री होऊ शकलो नाही, म्हणून दुःखी आहेत. कधीपर्यंत पदावर राहू हे माहिती नसल्याने मुख्यमंत्रीदेखील दुःखी आहेत, असं गडकरी म्हणाले. भाजपने काही मुख्यमंत्री बदलल्याने स्वपक्षाला त्यांनी कानपिचक्या दिल्याची चर्चा आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com