Friday, April 26, 2024
Homeराजकीयकेंद्रीय मंत्री राणे यांची पत्नी आणि मुलगा नितेशविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी

केंद्रीय मंत्री राणे यांची पत्नी आणि मुलगा नितेशविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी

पुणे |प्रतिनिधी| Pune

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची पत्नी नीलम राणे आणि मुलगा नितेश राणेंविरुद्ध पुणे पोलिसांकडून लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ही कारवाई डीएचएफएल कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे न्यायालयाच्या आदेशावरुन करण्यात आली आहे.

- Advertisement -

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने तक्रार नोंदवली होती. आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचं कर्ज घेतलं होतं. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती.

याचबरोबर नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने डीएचएफएल कडून ४० कोटींचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाची परतफेड न झाल्याने डीएचएफएल संबंधित एजन्सीकडे याप्रकरणी तक्रार केली होती. पुणे पोलिसांनी ही लुक आउट नोटीस जारी केलेली आहे.

३ सप्टेंबर रोजी ही लुकआउट नोटीस पाठवली गेली आहे. हे पत्र छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाला देखील प्राप्त झालेलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या