चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावर अमित शाह नाराज?

चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावर अमित शाह नाराज?

मुंबई | Mumbai

भापज नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे सध्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात सापडले आहे. त्यांनी केलेल्या या विधानाची पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या या विधानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावर अमित शाह नाराज?
राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, हिंमत असेल तर...

निवडणुकांच्या तोंडावर अशी विधानं खपवून घेतली जाणार नाहीत, अशा शब्दात खुद्द अमित शाह यांनी पाटलांना खडसावल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वादग्रस्त विधाने (Controversial Statement) करण्यापेक्षा केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगिरीवर बोलण्यावर भर द्या, अशी ताकीद अमित शाह यांची भाजप नेत्यांना दिल्याचे कळते.

चंद्रकांत पाटलांच्या 'त्या' विधानावर अमित शाह नाराज?
अजित पवारांना 'या' प्रकरणात ईडीचा मोठा दिलासा

दरम्यान, काल चंद्रकांत पाटील यांच्यावर उध्दव ठाकरे यांनी जोरदार टिका केली होती. बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात लपले होते, बाबरी पाडण्यात शिवसेनेचा संबंध नव्हता असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांची तात्काळ हकालपट्टी करा तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली होती.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com