केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल
राजकीय

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात दाखल

त्यांनी गेल्या आठवड्यात करोनावर मात केली होती

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या आठवड्यात करोनावर मात केली होती. मात्र मध्यरात्री त्यांना पुन्हा दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास व थकवा जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहितीर रुग्णालयाने दिली आहे.after recovering from Covid, Amit Shah admitted to AIIMS

२ ऑगस्ट रोजी त्यांना करोनाची लागण झाल्यामुळे गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील आठवड्यात १४ ऑगस्ट रोजी ते करोनामुक्त झाले होते. अमित शाह यांनी स्वत: ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली होती.डॉ. रणदीप गुलेरीया यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे. अमित शाह यांची प्रकृती ठिक असून ते रुग्णालयातून आपले काम पाहणार असल्याची माहितीही रुग्णलायाकडून देण्यात आली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com