Saturday, April 27, 2024
Homeराजकीयकेंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचा राजीनामा

केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचा राजीनामा

दिल्ली | Delhi

मोदी सरकारला एक मोठा धक्का बसला आहे. सरकारच्या मंत्रिमंडळातील एक मंत्र्याने राजीनामा दिला आहे. संसदेत आणलेल्या कृषी संबंधी विधेयकाच्या निषेधार्थ शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय अन्न प्रकिया मंत्री हरसिमरत कौर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. अकाली दलाच्या महत्त्वाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिल्यामुळे NDA मध्ये मोठी खळबळ माजली आहे. सरकारने आणलेल्या कृषीसंबंधी विधेयकाला विरोध करत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (union cabinet minister of food processing harsimrat kaur badal resign)

- Advertisement -

हरसिमरत कौर यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा ट्विटरवरुन केली आहे. यासंबंधी केलेल्या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, ‘शेतकरीविरोधी अध्यादेश व कायद्याच्या निषेधार्थ मी केंद्रीय मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांसोबत त्यांची मुलगी आणि बहीण म्हणून त्यांच्यासोबत उभं राहण्याचा मला अभिमान वाटतो.’

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हरसिमरत कौर यांचा राजीनामा मंजूर केला असून राष्ट्रपती यांनी कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे अतिरिक्त कारभार सोपवला आहे. तसेच हरियाणातील राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या