शिवसैनिकांच्या जीवावर याल तर याद राखा; उद्धव ठाकरे आक्रमक

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरेFile Photo

मुंबई | Mumbai

भायखळ्यात गुरुवारी रात्री दोन शिवसैनिकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. अज्ञातांकडून शिवसेना विभाग क्रमांक 11 मधील उपविभाग प्रमुख आणि भायखळा विधानसभा मतदारसंघातील समन्वयक यांच्यावर हा हल्ला झाला...

हे हल्लेखोर दुचाकीवरुन आले आणि तलवारीने हल्ला केला. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या शाखेला भेट दिली. त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरे
औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराला स्थगिती

ते म्हणाले की, शिवसैनिकांचं रक्त न सांडण्याचे मी आव्हान करत आहे. मात्र असे होत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागता कामा नये. पोलिसांनी शिवसैनिकांनी संरक्षण का दिले नाही, असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पोलिसांना (Police) केला.

उद्धव ठाकरे
राज्यात पावसामुळे ९९ बळी; नाशकात 'इतके' दगावले

पोलिसांनी (Police) राजकारणात पडू नये. शिवसैनिकांच्या जिवावर येणार असेल तर खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या पदाधिकाऱ्यांच्या जीवाला धोका असल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे. तसेच हल्लेखोरांवर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com