“नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी...”; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

“नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी...”; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (Shivsena) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आता उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) कट्टर वैरी नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एक ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

नारायण राणे (Narayan Rane) यांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणेंनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर हा गंभीर आरोप केला आहे. नितेश राणेंच्या या आरोपानंतर खळबळ उडाली आहे. (Sarvamat News)

नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे की, 'माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा एकनाथ शिंदेप्रमाणेच (Eknath Shinde) त्यांनाही मारण्यासाठी तथाकथित शांत आणि संयत पक्षप्रमुखांकडून काही सुपाऱ्या देण्यात आल्या. हे 'म्याव म्याव' संपवून टाकूया त्यानंतर आपण व्याजासह वस्त्रहरण सुरू करू.'

दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदेना झेड प्लस सुरक्षा देण्याचं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाकारल्याचा दावा शिवसेनेतले बंडखोर आमदार सुहास कांदेंनी काल केला. त्यानंतर नितेश राणे यांच्या या खळबळजनक आरोपाने राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com