Sunday, May 5, 2024
Homeमुख्य बातम्यावेदांता फॉक्सकॉन वादावर ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले...

वेदांता फॉक्सकॉन वादावर ठाकरेंनी सोडलं मौन; म्हणाले…

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रात तब्बल दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून सुमारे दीड लाख नोकऱ्या निर्माण करण्याची क्षमता असलेला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने राजकीय गदारोळ सुरू झाला आहे. दरम्यान शिवसेनाप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे प्रकल्प गेला, पण राज्य सरकार त्यावेळी काय करत होतं? दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? वेदांता आणि फॉक्सकॅान सारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचं नुकसान झालं आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं आत्मपरीक्षण करावं. मविआमुळे हा प्रकल्प राज्यातून बाहेर गेला अशी टीका करण्याचं धाडसं कुणी करू नये अशी प्रतिक्रिया ठाकरेंनी दिली आहे.

दरम्यान या वेळी उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने जमा व्हा, असे आदेश दिले आहेत. शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना, शिवसैनिकांनासोबत घ्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या