शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार; मंत्री भुमरेंचा दावा

शिवसेनेचे आणखी दोन आमदार फुटणार; मंत्री भुमरेंचा दावा

पैठण | Paithan

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सतत पडझड सुरु असलेल्या शिवसेनेला आणखी दोन हादरे बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील (shivsena) आणखी दोन आमदार फुटतील असा खळबळजनक दावा शिंदे गटातील रोहयो मंत्री संदीपान भुमरे (sandipan bhumre) दावा केला आहे.

मंत्री संदिपान भुमरे पैठण येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा दावा केला असून त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहेत. नेमके ते दोन आमदार कोण? अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.

दरम्यान भुमरे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. भुमरे यांच्या पैठण मतदारसंघातील आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेला प्रचंड गर्दी झाली होती. हाच धागा पकडत संदीपान भुमरे यांनी त्यांना लक्ष्य केले. पैठणच्या बिडकीन गावात आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या सभेपेक्षा गारुड्याच्या खेळाला जास्त गर्दी होते, अशी खोचक टिप्पणी संदीपान भुमरे यांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com