उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये; आमदारांना दिले 'हे' आदेश

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

नागपूर | Nagpur

हिवाळी अधिवेशनानिमित्त (Winter Session) शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नागपुरात दाखल झाले. आज सायंकाळी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची तातडीच्या बैठकीचे आदेश दिले आहेत...

ही बैठक हॉटेल रेडिसनमध्ये आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान महाविकासआघाडीची (Mahavikas Aghadi) आज चार वाजता होणारी बैठक रद्द करण्यात आली आहे. आजच्याऐवजी ही बैठक आता उद्या सकाळी 9 वाजता विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी होणार आहे.

या बैठकीला उद्धव ठाकरेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे,

त्यामुळे आता विधिमंडळात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सामना बघायला मिळू शकतो. शिवसेनेत झालेल्या भुकंपानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर येणार आहेत.

2019 साली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य झाले. जून महिन्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असताना उद्धव ठाकरेंनी आपण आमदरकीही सोडत असल्याचं सांगितलं होतं, पण त्यांनी आमदार म्हणून कायम राहण्याचा निर्णय घेतला.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com