Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याShiv Sena Row : ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान,...

Shiv Sena Row : ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान, तातडीने सुनावणीची मागणी

दिल्ली | Delhi

शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या (Election Commission) निर्णयाला ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिले. बहुमताच्या आधारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाकडून आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील याबाबत सावध भूमिका घेतली असून ठाकरे गटाने याचिका दाखल करण्यापूर्वीच त्यांनी कोर्टात ‘कॅव्हेट’ दाखल केले आहेत. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिल्यास एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश न देता आमचीही बाजूही ऐकून घ्यावी, अशी विनंती शिंदे गटाच्या वतीने या ‘कॅव्हेट’द्वारे करण्यात केली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेसह अन्य आठ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मंगळवारपासून पुन्हा नियमित सुनावणी होणार आहे. त्यापूर्वीच निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह याबाबत शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. उद्धव ठाकरे यांनी त्याविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या