Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याKarnataka Election Results : आता भाजपला महाराष्ट्रातूनही घालवू; उध्दव ठाकरेंनी दिला...

Karnataka Election Results : आता भाजपला महाराष्ट्रातूनही घालवू; उध्दव ठाकरेंनी दिला आमदारांना विश्वास

मुंबई | Mumbai

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला जोरदार धक्का बसताना दिसून येत आहे. तर काँग्रेसने जोरदार आघाडी घेतली आहे. बहुमताकडे वाटचाल करत असल्याने कर्नाटकचा कौल कुणाला? हे आता स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षा प्रकरणी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांची आज मातोश्री (Matoshree) इथे बैठक पार पडली. ‘मातोश्री’ वर ठाकरे गटाच्या झालेल्या बैठकीतही कर्नाटक निवडणूक निकालावर चर्चा झाली.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने दिलेल्या निकालानंतर ठाकरे गटाची पुढची रणनीती काय असणार यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर विस्तृत चर्चा झाली असली तरी, कर्नाटकाच्या निकालाचा मुद्दाही चर्चिला गेला. भाजपचं फोडाफोडीचं राजकारण लोकांना आवडलेलं नाही. भाजपला कर्नाटकातून घालवलं आता महाराष्ट्रातूनही घालवू असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आमदारांना दिला.

Karnataka Election Results : कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला…; प्रियंका चतुर्वेदींची भाजपवर खोचक टीका

दरम्यान, मातोश्रीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मार्गदर्शन केल्याचे सांगितले जाते. सुप्रीम कोर्टाच्या सत्तासंघर्षावरील निकालानंतर ही बैठक झाली.

या बैठकीत कोर्टाच्या निर्णयावरून आमदारांच्या शंकाचे निरसन करण्यात आलं. कोर्टाच्या निर्णयानंतर आमदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. तसंच पुढील आठवड्यात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यांनाही असेच आदेश दिले जातील.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या