Monday, April 29, 2024
Homeराजकीय"शिंदे सरकारच्या खुर्चीचे पाय..."; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

“शिंदे सरकारच्या खुर्चीचे पाय…”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

मुंबई | Mumbai

रत्नागिरीतील बारसू रिफायनरीला (Barsu Refinery) स्थानिकांनी प्रचंड विरोध केला आहे. रिफायनरीला नकार देत आंदोलन केले जात आहे. या आंदोलकांची आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांनी भेट घेतली. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी बारसूतील आंदोलकांशी संवाद साधला. त्यावेळी ठाकरेंनी राज्याकर्त्यांना बारसूत येऊन रिफायनरीचे सर्मथन करून दाखवा, असे आव्हान दिले आहे.

- Advertisement -

दरम्यान, उध्दव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बारसूमध्ये प्रकल्प झाला तर फायदा होईल असं मला गद्दारांनी सांगितलं होतं. आम्ही जेव्हा नाणारला विरोध केला आणि नाणारमध्ये हा प्रकल्प होणार नाही हे ठरलं तेव्हा या गोष्टी घडल्या होत्या.

Operation Kaveri : ‘ऑपरेशन कावेरी’ फत्ते… ३८६२ नागरिक सुखरुप मायदेशी परतले

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘नाणार येथे प्रकल्प होऊ नये यासाठी तेथील ग्रामस्थांच्या मागणीला शिवसेनेने पाठिंबा दिला. त्यानंतर तो प्रकल्प तेथून घालवला. त्यावेळी माझी भूमिका स्पष्ट होती. प्रकल्पाला विरोध किंवा समर्थन असं आम्ही काही ठरवलं नाही. जे स्थानिक प्रकल्पाच स्वागत करतात तिथे तो उभारला जाऊ शकतो. त्याचवेळी आशिष देशमुख यांच्याही बातम्या आल्या होत्या. आशिष देशमुख म्हणाले होते प्रकल्प आमच्याकडे द्या तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं त्यासाठी पाणी लागतं, तेव्हा ते म्हणाले होते आम्ही बाकी पाहतो’.

रत्नागिरीत राज ठाकरेंची तोफ धडाडणार; निशाण्यावर कोण?

मला या सरकारच्या खुर्चीचे पाय डगमगताना दिसत आहेत. मी प्रकल्पाला विरोध करण्याची भूमिका घेतली असली तरीही सरकार एकही पाऊल मागे घेतलं जात नाहीये. पण त्यांच्या खुर्चीचे पाय डगमगत आहेत. हे सरकार पडेल असंही त्यांनी म्हटलं आहे. जर माझी सगळ्या गोष्टींची नकारघंटा असती तर समृद्धी महामार्ग झाला असता का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. इतकंच नाही तर जेव्हा सगळे चांगले प्रकल्प गुजरातला जात होते तेव्हा हे शेपूट घालून का बसले होते? असाही संतप्त प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हुकूमशाहीने प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र पेटवू; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

माझ्याकडे कागदपत्रांचा गठ्ठा आला होता. ग्रामपंचायतीचे ठराव आहेत असं मला सांगण्यात आलं होतं, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच माझ्याच काळातील एअर बस आणि वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला का दिले? हा प्रकल्प गुजरातला न्या. वेदांत फॉक्सकॉन इतर प्रकल्प महाराष्ट्राला द्या. गिफ्ट सिटी महाराष्ट्राला द्या. चांगल्या गोष्टी गुजरात आणि दिल्लीला दिल्या. इतर प्रकल्प आम्हाला दिल्या आहेत, असं ही ते म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

- Advertisment -

ताज्या बातम्या