Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याकोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज; उध्दव ठाकरेंची जहरी टीका

कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज; उध्दव ठाकरेंची जहरी टीका

मुंबई | Mumbai

गुजराती आणि राजस्थानचे लोक मुंबईतून (Mumbai) निघून गेल्यास मुंबईत काय उरेल? असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केले. यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर जहरी टीका केली आहे….

- Advertisement -

ते म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी यांनी आज कहर केला. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. राज्यपाल पदाचा मी अवमान करू इच्छीत नाही. पण या पदाचा मान त्या पदावरील व्यक्तीने राखला पाहिजे.

राज्यपालपदाचा मान कोश्यारी यांनी ठेवला नाही. राज्यपाल सातत्याने वादग्रस्त विधान करतात. महाराष्ट्राचा अपमान कराल तर. कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवू, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

राज्यपालांच्या ओठावरील वक्तव्य कुणाच्या पोटातले? असा सवालदेखील त्यांनी विचारला आहे. राज्यपाल जाणून बुजून अपमान करत आहेत. रक्त सांडून ही मुंबई मिळवली आहे, कोश्यारींनी आंदणात दिली नाही.

हिंदूंमध्ये फुट पाडण्याचे काम कोश्यारी करत आहेत. त्याच स्क्रीप मुंबईतून की दिल्लीतून येते हे माहित नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या