
मुंबई | Mumbai
आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांशी (Shivsainik) संवाद साधला. आज पुन्हा एकदा त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर कडाडून टीका केली आहे. हिंमत असेल तर नवा पक्ष काढून दाखवा असे आव्हान त्यांनी बंडखोरांना दिले...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली. हे शिवसैनिक नाही, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.
यांना बाळासाहेबांचा फोटो हवा, पण त्यांचा मुलगा नको, असे देखील ते म्हणाले. तसेच भाजपला (BJP) शिवसेना (Shivsena) संपवायची होती, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केला.
शिवसेनेत (Shivsena) आगामी काळात काही महत्वपूर्ण बदल करण्याचे संकेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. अनेक महिला तसेच पुरुषांना विविध जबाबदाऱ्या द्यायच्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.