कुस्तीसाठी भाजप उतरला तर स्पर्धेआधीच...; मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी

कुस्तीसाठी भाजप उतरला तर स्पर्धेआधीच...; मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी
devendra fadnavis uddhav thackerayराजकीय

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, सर्वात आधी मी रामनवमीच्या (Ramnavami) सर्वांना शुभेच्छा देतो. अशा प्रकारच्या सभा घेण्याची माझी सवय नाही कारण आपण समोरासमोर लढणारे मर्द आहोत. कोल्हापूर (Kolhapur) ही मर्दांची भूमी आहे.

कालच महाराष्ट्र केसरीचा (Maharashtra Kesari) बहुमान पृथ्वीराजने मिळवला. पृथ्वीराजच्या रूपाने तब्बल २१ वर्षानंतर कोल्हापूरला हा बहुमान मिळाल्याचा मला अभिमान आहे. पृथ्वीराजचेह मी मनापासून अभिनंदन करतो. मर्दाने लढायचे कसे हे कोल्हापूरच्या मातीतून शिकायला हवे. तरी नशीब ही निवडणूक (Election) आहे.

जर राजकीय पक्षांच्या कुस्त्या सुरू झाल्या तर आपल्या समोरासमोर लढणारा मर्द कुणी नाही. जर कुस्तीत भाजप (BJP) उतरला तर समोरच्या पैलवानाशी कुस्ती खेळण्यापेक्षा आदल्या दिवशी सीबीआय, ईडीच्या (ED) धाडी टाकतील, असा टोला त्यांनी लगावला.

ते पुढे म्हणाले की, आपली एक नाळ जोडलेली आहे. कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. हे काल जे कोणी येऊन गेले, मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ही सभा नक्कीच घेतली नाही. मात्र अनेकदा असे होते की आपल्याकडे काही बोलायचे मुद्दे नसले, की मग विरोधकांवर खोटे आरोप करायचे, एक भ्रम निर्माण करायचा आणि आपले कुठे काही घोडं पुढे सरकतं का? हे पहायचे. ही यांची एक वाईट सवय झाली आहे. स्वत:च्या कर्तृत्वाचे सांगण्यासारखे काही नसल्याने द्वेष पसरवणारे मुद्दे पुढे करायचे आणि आपले इप्सित साध्य करायचे, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला.

मध्यंतरी आपल्या आमदारांची बैठक छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या घरी झाली. तिथे मी बोललो होतो की महाविकास आघाडी यामध्ये शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) आहेच. आम्ही उघडपणे सगळे करत आहोत, लपूनछपून नाही. आम्ही कमी कुठे पडतो? कामात पडतोय का, तर अजिबातच नाही.

आपत्ती आली तर धावून जायला कमी पडतोय का? अजिबातच नाही. सरकार म्हणून प्रशासकीय गोष्टींमध्येदेखील आम्ही कमी पडत नाही. कमी कुठे पडतो तर खोटे बोलण्यात कमी पडतो. पण आम्ही खोटे बोलणारच नाही. कमी पडलो तरी चालेल पण आम्ही स्वत:ला शिवरायांचे मावळे समजत असल्याने खोटे बोलणे आमच्या रक्तात नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Related Stories

No stories found.