Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याआरोग्य यंत्रणेचे बारा वाजलेले असताना 'एक फुल दोन हाफ' कुठे आहेत?; रुग्णांच्या...

आरोग्य यंत्रणेचे बारा वाजलेले असताना ‘एक फुल दोन हाफ’ कुठे आहेत?; रुग्णांच्या मृत्यूवरून उद्धव ठाकरे संतप्त

मुंबई | Mumbai

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या काळात आम्ही सक्षमपणे लढा दिला. पण, सरकार बदललं आणि आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजले, असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी नांदेड, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर मधील रुग्णांच्या मृत्यूचा उल्लेख केला.

- Advertisement -

विषय रोज नवीन नवीन आहेत. काही विषय खूप वर्षांपासून तसेच्या तसे आहेत. आज मी जरा अस्वस्थ आहे. सध्या आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेत, ते बघितल्या नंतर चीड येते. आज मी मुख्यमंत्री नाहीये, मविआ सरकार नाहीये. आरोग्य व्यवस्था तीच आहे. करोना सारख्या संकटाचा सामना केला. त्याच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. गुवाहटीमध्ये टेबलवर नाचायला पैसे आहेत, मजामस्ती करायला पैसे आहेत, पण औषधासाठी पैसे नाहीत का ? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. एक फूल दोन हाफ कुठे आहेत. सरकारकडे औषधांसाठी पैसे नाही म्हणता, पण परदेश दौरा सुरु आहे, जाहीरातबाजी करण्यासाठी सरकारकडे पैसे कुठून येतोय, असा थेट सवाल त्यांनी केला.

Accident News : भीषण अपघात! पर्यटकांना घेऊन जाणारी बस उलटली; २१ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी

नांदेडमधील अधिष्ठांना मस्तवाल खासदारांनी शौचालय साफ करायला लावले. हे चुकीचेच आहे. मात्र, त्यामुळे त्या खासदारावर गुन्हा दाखल झाला आहे. त्या अधिष्ठांतांवर दबाव टाकण्यासाठीच अधिष्ठांतावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. केवळ नांदेडच्या अधिष्ठांतांवरच गुन्हा दाखल का करण्यात आला? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील संबंधित जबाबदार व्यक्तीवरही कारवाई करायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, नागपूरमध्ये पूर आल्यानंतर तेथे जाण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबिय चित्रपटातील अभिनेते आणि अभिनेत्रींसोबत फोटो काढण्यात व्यस्त होते, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तुम्ही हिंदू-मुस्लिम करतात, आता नागपूरमधील नागरिकांच्या घरात गणपती बसलेले नव्हते का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

‘स्वदेस’ फेम अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारचा भीषण अपघात, जोडप्याचा मृत्यू

अजित पवार नाराजीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या अजित पवार नाराज असल्याच्या बातम्या येत आहे. अजित पवार यांची नाराजी मी बघितली नाही. महाविकासआघाडी सरकारमध्ये असताना अजित पवार चांगले काम करत होते. ते आमच्यासोबत आहेत म्हणून ज्यांची पोटदुखी होती त्यांच्या उरावर अजित दादा बसले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या