Maharashtra Politics : उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर; 'या' महत्त्वाच्या विषयावर चर्चेची शक्यता

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई | Mumbai

एकीकडे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे पाटील हे गेल्या १५ दिवसांपासून उपोषणास (Hunger Strike) बसले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत (Uddhav Thackeray and MP Sanjay Raut) हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. त्यामुळे या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे...

संग्रहित छायाचित्र
Maharashtra Politics : "वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या..."; भास्कर जाधवांचा बावनकुळेंवर निशाणा

बुधवार (दि. १३ सप्टेंबर) रोजी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या (Sharad Pawar) निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला इंडिया आघाडीतील (India Alliance) सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये जागावाटपाचे सूत्र काय असावे याबाबत दिल्लीत खलबतं होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे याच संदर्भात उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे सिल्व्हर ओकवर (Silver Oak) शरद पवारांची भेट घेण्यासाठी गेल्याची शक्यता आहे.

संग्रहित छायाचित्र
आसाम भूकंपाने हादरले; दोन आठवड्यात २० धक्के

दरम्यान, या बैठकीस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्र्देशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे देखील उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. तर इंडिया आघातील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडून (Congress) या बैठकीसाठी कोण उपस्थित आहे, याबाबतची माहिती अद्याप कळू शकलेली नाही.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

संग्रहित छायाचित्र
संभाजी भिडेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले...
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com