उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्क-वितर्कांना उधाण

उदयनराजे भोसलेंनी घेतली शरद पवारांची भेट; तर्क-वितर्कांना उधाण

दिल्ली l Delhi

खासदारकीचा त्याग करून भाजपमध्ये आलेले, सहा महिन्यांत दुसऱ्यांदा निवडणुकीस सामोरे गेलेले भाजपचे (BJP) राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) सदिच्छा भेट घेतली.

उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांच्या दिल्लीतील ६ जनपथ निवासस्थानी काल भेट घेतली. यावेळी त्यांनी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ देऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या असल्यातरी, या भेटीतून आगामी काळात वेगळी राजकीय समीकरणं उदयास येण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.

उदयनराजे भोसले यांनी या भेटीचा फोटो ट्वीट करून विविध राजकीय चर्चाना तोंड फोडलं आहे. या ट्वीटमध्ये उदयनराजे भोसले यांनी “आदरणीय खासदार शरद पवार यांची दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट”, असं म्हटलं आहे.

दरम्यान उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडली असली तरी त्यांची शरद पवार यांच्यावर असलेले प्रेम व जवळीक संपलेली नाही. मध्यंतरी शरद पवार आजारी होते, त्यावेळी उदयनराजेंनी पुण्यात त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. त्यामुळं शरद पवार आणि उदयनराजे यांचं वेगळं नातं निर्माण झालं आहे. त्यातच या भेटीमुळे पुन्हा एकदा त्यांच्या घरवापसीची शक्यता वर्तवली जाऊ लागली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com