Thursday, April 25, 2024
Homeराजकीयमराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा

मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा

मुंबई / प्रतिनिधी

राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, अशी मागणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. उदयनराजे यांनी आपल्या मागणीचे निवेदन ठाकरे यांना दिले.

- Advertisement -

मराठा आरक्षण प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी आज उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षण तसेच अन्य विषयांवर अर्धा तास चर्चा झाली.

उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली होती. त्यानंतर आज त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणाबाबत स्वत: लक्ष घालण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणासंदर्भात काही मुद्द्यांवर श्वेतपत्रिका काढावी. यामुळे समाजात निर्माण झालेला असंतोष कमी होईल, असेही उदयनराजे यांनी सांगितले.
पॉइंटर्स
या मुद्द्यांवर श्वेतपत्रिका काढा

#एसईबीसी उमेदवाराने ईडब्ल्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारले तर त्याचा सर्वोच्च न्यायालयातील खटल्यावर परिणाम होईल का?

#मोठ्या प्रमाणात ईडब्ल्यूएस आरक्षण स्वीकारले तर त्याचा खटल्यावर परिणाम होणार का?

# ईडब्ल्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवले तर त्याचा मराठा उमेदवारांवर काही परिणाम होईल का?

# राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने सर्वोच्च न्यायालायातील प्रलंबित खटल्यांसंबंधी जे निर्णय घेतले ते समाजासमोर आले पाहिजेत. जेणेकरुन या खटल्यात सरकारकडून वकिलांना काय निर्देश देण्यात आले याचा खुलासा होईल.

# एमपीएससीच्या माध्यमातून निवड झालेल्या २ हजार १५० उमेदवारांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना नोकरीत का सामावून घेत नाही?

- Advertisment -

ताज्या बातम्या