...तर मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन; उदयनराजेंचं खुलं आव्हान

...तर मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन; उदयनराजेंचं खुलं आव्हान

सातारा | Satara

'जर लोकांनी सांगितलं की, उदयनराजेंनी पैसे खाल्लेत तर मी मिशा काढून टाकेन', असा म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रराजेंना चॅलेंज दिले आहे. अलिकडेच शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्याला उदयनराजे भोसले यांनी आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिलं आहे. साताऱ्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर जोरदार टीका केला.

उदयनराजे म्हणाले की, माझं एक ठाम मत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या आणि आम्हाला सांगा की, आम्ही कुठे भ्रष्टाचार केला आहे आणि काय केलं आहे, आम्ही मान्य करू. हा माईक लोकांमध्ये द्या आणि त्यांना सांगू द्या की, उदयनराजेंनी पैसे खाल्ले आहेत. तसं कोणी जर बोललं तर देवाशपथ सांगतो मिशा काय, भुवया पण काढून टाकेन, परत तोंड ताखवणार नाही.

...तर मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन; उदयनराजेंचं खुलं आव्हान
डरो मत! राहुल गांधींच्या शिक्षेविरोधात काँग्रेस आक्रमक, मोठ्या आंदोलनाच्या तयारीत

तसेच, ज्यांची बौद्धिक पात्रता खुजी आहे, त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार. त्यांच्याकडे टीका करण्यापलिकडे काहीच उरलेलं नाही. पालकमंत्री, आमदारकी, नगरपालिका व अन्य संस्था अनेक वर्षे तुमच्या ताब्यात असताना विकासकामे का झाली नाहीत? तुम्हाला कोणी अडवलं होतं की तुमची इच्छाशक्ती नव्हती. मी तर म्हणेन तुमच्याच काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे कामे रखडली', असा आरोप उदयनराजे भोसले यांनी केला.

...तर मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन; उदयनराजेंचं खुलं आव्हान
ऊस तोडणी यंत्र खरेदीला ४० टक्के अनुदान; काय आहेत अटी व शर्ती?

पुढे बोलताना उदयनराजे की, तुम्हाला जनमत अजमावयाचं आहे तर सातारा काय महाराष्ट्रात चला. यांना लोकांसाठी झिजनं काय असतं, हे माहीत आहे का? तुम्ही जर महान कार्य केलं तर निवडणुकीत सर्वसामान्य माणसापुढे का टिकू शकला नाही. लोकांचं हित हाच माझा स्वार्थ आहे. तसेच, दुसऱ्याला कमी लेखून माणूस कधी मोठा होत नसतो. तो स्वत:च्या कर्तृत्वाने मोठा होतो. मला काय स्वत:चं पेटिंग काढण्याची हौस नाही. लोकं का पेटिंग काढतायत याचा कधी विचार केलाय का?" असा सवाल त्यांनी केला.

...तर मिशाच काय, भुवया पण काढून टाकेन; उदयनराजेंचं खुलं आव्हान
RRR च्या 'नाटू नाटू'ची गाड्यांनाही पडली भुरळ; अप्रतिम Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com