Friday, April 26, 2024
Homeराजकीयउदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मानले मुख्यमंत्री योगींचे आभार..

उदयनराजे आणि संभाजीराजे यांनी मानले मुख्यमंत्री योगींचे आभार..

मुंबई | Mumbai

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी, आग्रा येथे उभारण्यात येणाऱ्या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. यामुळे खा. छत्रपती उदयनराजे भोसले आणि खा. छत्रपती संभाजीराजे यांनी योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहे.

- Advertisement -

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे की,”छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केलं. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आग्रा नगरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच मनापासून अभिनंदन..”

छत्रपती संभाजीराजे यांनी म्हंटले आहे की, “यूपी सरकारने मुघल संग्रहालयाचे नामांतर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असे करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या वतीने माननीय मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो.”

नामांतरची घोषणा करताना काय म्हणाले योगी आदित्यनाथ?

योगी आदित्यनाथ यांनी याबाबत एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये छत्रपती “शिवाजी महाराज हेच आपल्या सर्वांचे नायक” असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आगरा येथे उभारण्यात येत असलेल्या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखण्यात येईल. आपल्या नव्या उत्तर प्रदेशमध्ये गुलामीची मानसिकता दाखवणाऱ्या कोणत्याही प्रतिकांना कोणतेही स्थान असणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे नायक आहेत. जय हिंद, जय भारत.”

- Advertisment -

ताज्या बातम्या