Friday, April 26, 2024
Homeराजकीयबिहारच्या निकालावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ट्विटरवॉर

बिहारच्या निकालावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ट्विटरवॉर

मुंबई l Mumbai

बिहारमध्ये अखेर रात्री उशीरा चित्र स्पष्ट झालं असून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने १२५ जागांवर विजय मिळवला आहे. तर तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला ११० जागा जिंकण्यात यश आलं. बिहारमध्ये इतरांच्या खात्यात ८ जागा पडल्या. मात्र बिहारच्या निकालावरून महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ट्विटरवॉर सुरु झाले आहे.

- Advertisement -

‘जगंलराज का युवराज’ला बिहारच्या जनतेने नाकरले – आशिष शेलार

‘काँगसने महाराष्ट्रात ‘हातात’ ‘धनुष्यबाण’ धरला, त्याचा ठासून फटका बिहारमध्ये बसला…आता…महाराष्ट्रात सुध्दा जनतेच्या ‘घड्याळाचे’ काय सांगावे टायमिंग…?पंचायत ते पार्लमेंट मॅन ऑफ द मॅच पंतप्रधान नरेंद्र मोदीच! त्यांच्यासह नितीश कुमारजी, देवेंद्रजीं फडणवीस यांचे अभिनंदन!,’ असे ट्वीट आशिष शेलार यांनी केले आहे.

भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत सलगी केलेलेल्या ‘जगंलराज का युवराज’ला बिहारच्या जनतेने नाकरले. महाराष्ट्रात पण भ्रष्टाचारी काँग्रेस सोबत ‘जंगलाचे बेगडी प्रेमी युवराज’ युती करुन बसलेत. समजनेवाले को इशारा काफी है, असेही आशिष शेलार म्हणाले.

भाजप मित्रांनाच संपवतोय हे पुन्हा बिहारमध्ये सिद्ध झाले – रोहित पवार

रोहित पवार यांनी म्हंटले आहे कि, बिहारमध्ये काट्याची टक्कर सुरू असली तरी बलाढ्य शक्तीशी एकटे लढत असलेले तेजस्वी यादव हेच खरे हिरो आहेत आणि त्यांना बिहारी युवांनीही खंबीर साथ दिलीय. ही लढाई अजून संपली नाही, पण भाजप ज्या पद्धतीने मित्रांनाच संपवतोय याचं उत्तम उदाहरण यानिमित्ताने बिहारमध्ये पहायला मिळले, अशी टीका त्यांनी केली. तसेच यातून बोध घेऊन नितीश कुमार यांनी हे त्यांच्याशी झालेला घात पचवतात की काही वेगळा निर्णय घेतात, हे पहावं लागेल. तसंच कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतमोजणीत गडबड होणार नाही याची दक्षता घेऊन आपण स्वायत्त असल्याचं निवडणूक आयोग दाखवेल, असा विश्वास आहे आणि प्रशासनानेही आयोगाला साथ द्यावी, असे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.

कुठे आहे आपला चमत्कार? – किरीट सौमय्या

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने २२ उमेदवार उभे केले होते, या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना ‘नोटा’पेक्षाही कमी मतदान झाले, बिहारमध्ये शिवसेना उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले, १ टक्केही मतदान शिवसेनेला झालं नाही, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत तुमचा चमत्कार कुठे आहे? असा चिमटा भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला काढला आहे.

वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन – निलेश राणे

भाजपाने नेते निलेश राणे यांनी शिवसेना आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेनेनं स्वत:चा कचरा करुन घेतला असून बिहारमध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेची परिस्थिती जशी झालीय तशीच परिस्थिती महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यामुळे होईल. वारंवार देशात स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

तसेच “संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात राऊत करतील अशी खात्री आम्हाला आहे,” असा टोला लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या