Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याबॅनर उद्धवजींचा, धूर राष्ट्रवादीतून... घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी; जितेंद्र आव्हाड आणि शीतल...

बॅनर उद्धवजींचा, धूर राष्ट्रवादीतून… घरचा उपाशी, बाहेरचा तुपाशी; जितेंद्र आव्हाड आणि शीतल म्हात्रे यांच्यात जुंपली

मुंबई | Mumbai

शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. शिंदे गटात गेल्यापासून त्यांनी शिंदे गटाची हिरिहिरीने बाजू मांडली आहे. उद्धव ठाकरेंवरही अनेकदा बाण सोडले. आता शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात जुंपली आहे.

- Advertisement -

दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार शेरेबाजी सुरू आहे. एकमेकांच्या ट्विटला टॅग करत हे नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातील सभेतील ऊर्दूच्या पोस्टरवरून ही शाब्दिक चकमक उडाली आहे. शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचे ऊर्दूतील पोस्टर ट्विट केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंब्र्यातील ऊर्दूमधील पोस्टर ट्विट करत, ताई… यावर बोला, असं आव्हानच दिलं. त्यानंतर पुन्हा दोन्ही नेत्यांमध्ये ट्विटचा सिलसिला सुरू झाला.

शीतल म्हात्रेंनी २५ मार्च रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास उद्धव ठाकरे गटाच्या बॅनरचा एक फोटो ट्वीट केला होता. हा बॅनर उर्दू भाषेत छापला होता. “या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवलं होतं. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्ववादी विचारधारा? उध्वस्त सेना..खांग्रेसची चमचेगिरी”, असं ट्वीट शीतल म्हात्रेंनी केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या मालेगाव सभेसंदर्भातला हा बॅनर होता.

अख्खं कुटुंब संपलं! दोन मुलांसह उच्चशिक्षित पती पत्नीची विष घेवून आत्महत्या

दरम्यान, यावर प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे गटाचा एक बॅनर ट्वीट केला. हा बॅनरही उर्दू भाषेत असून त्यावर एकनाथ शिदेंसह अब्दुल सत्तार यांचाही फोटो आहे. “याच्यावर बोला ताई. खास तुमच्या माहितीसाठी. कारण नंतर दुसऱ्यावर ढकलायची तुमची सवय आहे”, असं ट्वीट आव्हाडांनी केलं.

या ट्वीटवर पुन्हा शीतल म्हात्रेंनी प्रत्युत्तर दिलं. “मुंब्र्यात कधीही शिवजयंती साजरी न करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांना ट्वीट चांगलंच झोंबलेलं दिसतंय. पण मला एक समजत नाही, मी बॅनर उद्धवजींचा टाकलाय आणि धूर चक्क राष्ट्रवादीमधून आलाय”, असं ट्वीट शीतल म्हात्रेंनी केलं.

ISRO ने रचला इतिहास! ३६ उपग्रहांसह सर्वात मोठ्या LVM3 रॉकेटचं यशस्वी प्रक्षेपण

त्यावर प्रत्युत्तरादाखल आव्हाडानी केलेल्या ट्वीटमध्ये “मला काम करताना गवगवा करण्याची सवय नाही. लोकांसाठी कार्यक्रम करतो. माझ्या मतदारसंघात येऊन विचारा. उघड्यावर लाज घालवणारं कृत्य मी करत नाही. आठवतंय ना? काय दे ढुं***, काय तो दांडा.. धूर कुठून निघाला?” असा खोचक सवाल करण्यात आला.

महापशुधन एक्सपोत १२ कोटीचा रेडा, ५१ लाखांचा घोडा अन् दीड फूट उंचीची मेंढी!

एकमेकांचे ट्वीट रिट्वीट करत शीतल म्हात्रे यांनी पुन्हा आव्हाडांना डिवचलं. पवारांची भाकरी खाऊन उद्धवजींची चाकरी करतात असा पलटवार म्हात्रेंनी केला.

त्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी म्हात्रेंना सज्जड दम दिला. तुम्हाला चिंता नसावी. उगाच बोलायला लावू नका. घरचा उपाशी बाहेरचा तुपाशी अशा शब्दांत आव्हाडांनी म्हात्रेंना प्रत्युत्तर दिलं.

शिर्डीत विवाहित महिलेवर अत्याचार, व्हिडिओ बनवून महिलेला केले ब्लॅकमेल

- Advertisment -

ताज्या बातम्या