Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याबारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध तृप्ती देसाई?

बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध तृप्ती देसाई?

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) गेल्या १४ वर्षांपासून बारामतीच्या खासदार आहेत. त्यांच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे बारामतीचे (Baramati) खासदार होते. १९९१ पासून हा मतदार संघ पवार कुटुंबाकडे आहे…

- Advertisement -

आता भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी सुरु केली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात जनतेला बदल हवा आहे. 15 वर्षांपासून बारामतीत घराणेशाहीच सुरु आहे. सुप्रिया सुळे यांनी कधीच कार्यकर्त्यांचा विचार केला नाही. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई असणार आहे, असे तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

तृप्ती देसाई यांनी बारामती मतदार संघातून आपण इच्छूक असल्याचे सांगत त्यांनी घराणेशाहीच्या विषयावरून पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे. बारामती मतदारसंघात घराणेशाहीचे राजकारण असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांना अटक; Porn Star प्रकरण भोवलं

तृप्ती देसाई यांच्या या भूमिकेमुळे त्या भाजपात प्रवेश करणार का? या चर्चांना आता उधाण आले आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीकडूनही (Aam Admi Party) तृप्ती देसाई यांना पक्षात येण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे काम चांगले असल्यामुळे आता भाजपलाही लोकांची पसंती असल्याचा विश्वास तृप्ती देसाई यांनी व्यक्त केला आहे.

कोयता गँगची दहशत गंगा घाटापर्यंत..

- Advertisment -

ताज्या बातम्या