माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना आदरांजली

माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना आदरांजली

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या हौतात्म्य दिनी जिल्ह्यात सर्व तालुक्यात त्यांना अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने विविध उपक्रम घेऊन सदभावना दिवस साजरा करण्यात आला.

या पार्श्वभुमीवर सकाळी काँग्रेस भवन येथे स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष शामकांत सनेर, शहर जिल्हाध्यक्ष युवराज करनकाळ, सेवा दलाचे अलोक रघुवंशी, मुकुंद कोळवले, किसान काँग्रेसचे शामकांत भामरे, भिवसन अहिरे, नरेंद्र पाटील, प्रविण पवार, बानु बाई शिरसाठ, विनोद गुंजाळ, हरीभाऊ पाटील आदी उपस्थित होते.

यानंतर जिल्हा टपाल कार्यालयात नागरिकांना मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले. तसेच या सरकारी कार्यालयांची फवारणी करण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com