Thursday, April 25, 2024
Homeराजकीयनिवडणुकांपूर्वीच ममतांंना मोठा धक्का

निवडणुकांपूर्वीच ममतांंना मोठा धक्का

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सत्ता राखण्यासाठी चांगलीच कंबर कसली आहे. परंतु,

- Advertisement -

निवडणूक ऐन तोंडावर आली असतानाही तृणमूल काँग्रेसला लागलेली गळती काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. या यादीमध्ये आता आणखी एकाची भर पडली असून, अजून एका मोठ्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

गेल्या महिन्यात राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणारे तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ममता बॅनर्जी यांचे जुने सहकारी, तसेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळामध्ये रेल्वे मंत्री राहिलेल्या दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्रिवेदी यांनी आज नवी दिल्लीमध्ये भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले.

भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर दिनेश त्रिवेदी यांनी म्हटले की, बंगालची जनता तृणमूल काँग्रेसला नाकारले आहे. राज्याच्या जनतेला विकास पाहिजे, त्यांना हिंसा आणि भ्रष्टाचार नको आहे. राजकारण काही ‘खेळ’ नसतो, ही एक गंभीर चीज आहे. खेळता-खेळता त्या (ममता बॅनर्जी) आपल्या आदर्श विसरल्या, अशी टीका त्यांनी केली.

दरम्यान, मुकुल रॉय, शुभेंद्रू अधिकारी यांच्यापाठोपाठ दिनेश त्रिवेदी हे आणखी एक तृणमूल काँग्रेसचे जुने नेते भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी त्यांच्या पक्षाच्या 291 उमदेवारांची .यादी जाहीर केली आहे. ममता स्वत: नंदीग्राममधून निवडणूक लढवणार आहेत. ममतांना त्यांचे जुने सहकारी शुभेंद्रू अधिकारी आव्हान देण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जी यांनी २९१ जागांसाठी उमेदरावारांची यादी जाहीर केली. ममता बॅनर्जी यांनी घोषित केलेल्या टीएमसीच्या या यादीत ११४ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. पक्षानं ५ मंत्री आणि २८ आमदारांना तिकीट दिलेलं नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या