दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; ममतादीदीचं भेटसत्र

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

देशात सध्या तिसऱ्या आघाडीसाठी विरोधी पक्षाचे नेते एकत्र येताना दिसत आहेत. त्यातच पाच दिवसांच्या दिल्ली (Delhi) दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) बुधवारी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Congress Acting President Sonia Gandhi) तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत.

दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांना भेटणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांची भेट घेण्याचाही त्यांचा प्रयत्न होता. मात्र, करोना महामारीच्या (Corona epidemic) पार्श्वभूमीवर आरटीपीसीआर चाचणीच्या (RTPCR test) बंधनामुळे ही भेट टाळावी लागल्याचे ममता बॅनर्जींनी सांगितले.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान निवासमध्ये (Prime Minister’s Residence) ममता बॅनर्जी यांनी मोदींसोबत चर्चा केली आहे. ममता बॅनर्जी पाच दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून सोमावारी दिल्लीत दाखल झाल्या आहेत.

तसेच ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या संभाव्य एकजुटीच्या चाचपणीसाठी राजधानीत आल्याचे मानले जात आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ममता बॅनर्जी या शरद पवारांची भेट घेणार आहेत. भेटीगाठी व्हायला हव्यात कारण यातून विरोधी पक्षाच्या ऐक्यावर एकमत होऊ शकेल का यावर चर्चा करणं गरजेचं आहे. ममता बॅनर्जी सोनिया गांधीना भेटत आहेत हे चांगलं लक्षण आहे. विरोधी पक्षाची एकजूट ही काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकांन एकमेकांना भेटलं पाहिजे. एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे,’ असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *