CBI चा ममतांना दणका; तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना घेतले ताब्यात

काय आहे प्रकरण?
CBI चा ममतांना दणका; तृणमूलच्या दोन मंत्र्यांसह चार नेत्यांना घेतले ताब्यात

कोलकाता | Kolkata

पश्चिम बंगालमध्ये ममतांचे सरकार येऊन अवघे काही दिवस झाले आणि पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात तृणमूल काँग्रेसने सत्ता स्थापन केली, मात्र त्यांच्या सरकार समोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत.

बहुचर्चित नारदा घोटाळ्याचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला आहे. या घोटाळ्यातील आरोपी आणि ममतांचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, सुब्रत मुखर्जी आणि आमदार मदन मित्रांसह भाजपाचे माजी नेते सोवन चटर्जी यांच्या घरावर CBI ने छापेमारी केली आहे. सोवन चॅटर्जी हे माजी महापौर आहेत. दरम्यान, नेत्यांना अटक केल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

तृणमूलच्या नेत्यांना CBI ने ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रचंड खवळल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी थेट सीबीआयलाच आव्हान दिलं आहे. आमच्या नेत्या आणि मंत्र्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यामुळे हिंमत असेल तर मलाही अटक करा, असं आव्हानच ममता बॅनर्जी यांनी दिलं आहे. दरम्यान, नेत्यांना अटक केल्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जीदेखील सीबीआय कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी सीबीआयला फिरहाद हाकिम यांच्यासहीत सुब्रत मुखर्जी, मदन मित्रा आणि सोवन चटर्जी यांच्या विरोधातील कारवाईला मंजूरी दिली होती. त्यावेळी हाकिम म्हणाले होते की, 'आमचा विश्वास आहे की आम्हाला क्लीन चीट मिळेल. मी न्यायालयावर विश्वास ठेवतो. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे, ही चांगली गोष्ट आहे. मी तिथे माझी बाजू मांडेन आणि मला न्याय नक्की मिळेल', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काय आहे घोटाळा?

नारदा घोटाळा हा स्टिंग ऑपेरेशनमधून समोर आला होता. २०१४ मध्ये तृणमूलचे सात खासदार, चार मंत्री, एक आमदार आणि एका पोलिस अधिकाऱ्याचे स्टिंग ऑपेरेशन करण्यात आले होते. एका प्रकल्पासाठी त्यांना रोख रक्कम देण्यात आली होती. बंगालमध्ये २०१६ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या स्टिंग ऑपेरेशनचा व्हिडिओ सार्वजनिक करण्यात आला. त्यानंतर बंगालसह दिल्लीतही खळबळ उडाली. आता पुन्हा एकदा हा घोटाळा चर्चेत आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com