चंद्रकांतदादांनी घरुनच केलं विजयस्तंभाला अभिवादन; म्हणाले, “शाईच काय छातीवर गोळ्याही...”

चंद्रकांतदादांनी घरुनच केलं विजयस्तंभाला अभिवादन; म्हणाले, “शाईच काय छातीवर गोळ्याही...”

पुणे | Pune

आज २०५ वा शौर्य दिवस (Shaurya Din) साजरा करण्यात येत आहे. कोरेगाव भीमा (Koregaon Bhima) येथे शौर्य दिनानिमित्तविजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी नागरिकांना मोठी गर्दी केली आहे. राज्यभरातून हजारोच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी कोरेगाव भीमामध्ये येथे दाखल झाले आहेत.

दरम्यान विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जाणार होते. पण त्यांना धमकीवजा इशारा देण्यात आल्याने ते कोरेगाव भीमा येथे गेले नाहीत. त्यांनी एक पत्र टि्वट करुन याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तसेच विजयस्तंभ परिसर विकासासाठी शासनाने घोषित केलेल्या १०० कोटी निधीची अंमलबजावणी करणार, असे त्यांनी सांगितले आहे.

चंद्रकांतदादांनी घरुनच केलं विजयस्तंभाला अभिवादन; म्हणाले, “शाईच काय छातीवर गोळ्याही...”
नवीन वर्ष, नवे नेते...! किरीट सोमय्यांचे जोरदार प्लॅनिंग, ‘या’ ५ नेत्यांची नावं केली जाहीर

चंद्रकांत पाटील यांनी काय म्हंटलं?

शौर्य दिनाच्या निमीत्ताने, दिनांक एक जानेवारीला युध्दात प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास अत्यंत विनम्र अभिवादन करतो. सर्वांनी शांततेने शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना द्यावी दर्शन घ्यावे. कोणतीही जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी सर्वांना अत्यंत नम्र आवाहन.

शौर्य दिनाच्या निमीत्ताने मानवंदना देण्यास, अभिवादन करण्यास भीमा कोरेगाव येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना देता यावी व येणाऱ्यांना अतिशय श्रद्धेने विजयस्तंभास मानवंदना देता यावी दर्शन घेता यावे यासाठी सरकारने सर्व सुविधा उभारल्या आहेत. त्या क्षेत्राच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधीही देण्याचे शासनाने निश्चित केले आहे.

बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक ०१ जानेवारी १९२७ रोजी आपल्या अनुयायांसह, भीमा कोरेगाव येथे शौर्याचे प्रतीक असलेल्या विजयस्तंभास मानवंदना दिली होती. तेव्हापासून हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमाकोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येत असतात.

चंद्रकांतदादांनी घरुनच केलं विजयस्तंभाला अभिवादन; म्हणाले, “शाईच काय छातीवर गोळ्याही...”
दिवसाढवळ्या महिलेच्या अपहरणाचा प्रयत्न, घटना CCTV कॅमेरात कैद

बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल माझ्या मनात प्रचंड श्रद्धा आहे तिचे जाहीर प्रदर्शन करणे हा माझा स्वभाव नाही. सन १९८२ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मशताब्दी निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने रत्नागिरीचे पतीतपावन मंदिर ते दादरच्या चैत्यभूमी पर्यंत एक महिनाभर चाललेल्या समता यात्रेचे नेतृत्व मी केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं यासाठी शेकडो गावांमध्ये केलेल्या संवाद यात्रेचे नेतृत्वही मी केलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घराघरात साजरी व्हावी व नव्या पीढी पर्यंत त्यांचे विचार पोहोचावेत म्हणून प्रत्यक्ष प्रयत्न केले, आजही, एक नाही दोन नाही कोल्हापुरातील वस्त्यांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये मी लहान मुलांच्या बुद्धीचा विकास करणारी खेळघरे' सुरू केली आहेत, व वंचितांचा शैक्षणीक विकासासाठी मी वचनबध्द आहे. मी दोन वेळा दिलगिरी व्यक्त करुनही माझ्या विधानाचा विपर्यास करून, माझ्यावर शाई फेकण्याचा भ्याड हल्ला झाला.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला म्हणणा-यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना पायदळी तुडवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कुठल्याही आंदोलनात अपवादानेही हिंसा नव्हती, आताही मी भीमा कोरेगाव ला विजयस्तंभाच्या दर्शनास व अभिवादनास आलो तर पुन्हा शाई फेकू म्हणून धमकी आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालण्यासाठी मी शाईच काय छातीवर गोळ्याही झेलण्यास तयार आहे, परंतु हजारो, लाखो अनुयायी दरवर्षी भिमाकोरेगांवला विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणान्यांमध्ये, अशा एखाद्या घटनेमुळे गालबोट लागावे, जातीय दंगे व्हावे, अशी काही जणांची सुप्त इच्छा आहे. मोठ्या प्रमाणात माझ्या माता भगिनी, वयस्कर मंडळी, लेकरं तिथे श्रध्देने आले असतील, येत असतील तर त्यांची श्रद्धा व सुरक्षितता ही माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे.

आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्या हृदयात आहेत त्यामुळे मी माझ्या घरी आदरणीय बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याना वंदन करून विजयस्तंभास मानवंदना देणार आहे. समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा मनसुबा मी पुर्ण होऊ देणार नाही आहे. सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगावला उभारलेल्या विजयस्तंभास मी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com