मलिक पुन्हा गरजले; जमीन हडपणाऱ्यांंचा लवकरच भांडाफोड

मलिक पुन्हा गरजले; जमीन हडपणाऱ्यांंचा लवकरच भांडाफोड
मंत्री नवाब मलिक

मुंबई | Mumbai

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आरोपांची पुन्हा नवीन आरोप केला आहे. मुंबई येथे मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या (BJP) एका माजी मंत्र्यावर मंदिराची जमीन हडपल्याचा आरोप केला आहे...

भाजपने नवाब मलिक यांनी वक्फ बोर्डात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्याला मलिक यांनी आज उत्तर दिले. मलिक म्हणाले की, भाजपचे आरोप बिनबुडाचे आहेत. उलट आम्ही स्वत: 'क्लीन अप' मोहीम सुरू केली आहे.

ही मोहीम सुरूच राहायला हवी असे माझे मत आहे. राज्यात मंदिर, मशीद आणि दरग्याहच्या जमिनी ज्यांनी कोणी हडपल्या आहेत, त्या चव्हाट्यावर येतील.

'भाजपच्या एका माजी मंत्र्याने मंदिराची शेकडो एकर जमीन हडपली आहे. देवाच्या नावावर दिलेल्या जमिनी ज्यांनी लुटल्या आहेत, त्या सर्वांना तुरुंगात टाकायला हवे. आम्ही कारवाई सुरू केलीच आहे, पण ईडीने आम्हाला त्यात मदत करावी, अशी अपेक्षा मलिक यांनी व्यक्त केली. मंदिराची जमीन माजी मंत्र्याने कशी हडपली? याचा भांडाफोड लवकरच करणार असल्याचा इशारादेखील मलिक यांनी दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com