ते 'बीएमसी'शिपायांच्या घरीही धाड टाकायला कमी करणार नाहीत!

शिवसेना नेते खा.संजय राऊत यांची केंद्रीय तपास यंत्रणांवर खोचक टीका
ते 'बीएमसी'शिपायांच्या घरीही धाड टाकायला कमी करणार नाहीत!

मुंबई | प्रतिनिधी

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ( ED ) अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक ( Minority Development Minister Nawab Malik )यांच्यावर कारवाई केल्यानंतर शुक्रवारी आयकर विभागाने ( IT )शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धाड टाकली.

केंद्रीय यंत्रणांच्या सुरू असलेल्या या गैरवापरावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP. Sanjay Raut - Shivsena )यांनी जोरदार टीका केली आहे. महापालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणा ( Central Investigation Agency )मुंबई महानगरपालिकेतील शिपायांच्या घरीही धाड टाकायला कमी करणार नाहीत, अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

सध्या अत्यंत खालच्या दर्जाचे राजकारण सुरू आहे. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये केंद्रीय तपासयंत्रणा आणि राजभवनाचा गैरवापर सुरु आहे. महापालिका निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होईल. त्यामुळे आता महापालिकेतील अनेक शिपाई शर्टाच्या खिशावर धनुष्यबाणाचं चिन्ह लावतात.

मराठी माणूस आणि शिवसैनिक असल्यामुळे ते धनुष्यबाणाचं चिन्ह लावतात. त्यामुळे उद्या त्यांच्या घरावरही धाडी पडू शकतात, अशा शब्दात राऊत यांनी आयकर विभागाच्या कारवाईचा समाचार घेतला. केंद्रीय तपास यंत्रणांकडून खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोपही त्यांनी लागवला.

२०२४ पर्यंतच हे सहन करावे लागेल

२०२४ पर्यंत महाराष्ट्र, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगढ आणि पंजाबला अशा कारवाया सहन कराव्या लागतील. भाजपचे नेते डर्टी पॉलिटिक्स करत आहेत. भाजपकडून आपलं सरकार नसलेल्या राज्यांना केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत त्रास दिला जात आहे. भाजपचे नेते हे काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत का? भाजपचे नेते पाप करतात आणि नंतर गंगेत स्नान करतात. त्यामुळे 'गंगा मैली' झाली आहे, असा चिमटाही राऊत यांनी काढला.

तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणा किंवा सुरक्षादलांना आमच्या दारात उभे केले, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी आमच्या तोंडातून जळजळीत सत्यच बाहेर पडणार. आम्ही निर्भय आणि बेडर आहोत, असेही संजय राऊत यांनी बजावले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com