Thursday, April 25, 2024
Homeराजकीयलोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्यांची होणार चौकशी

लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्यांची होणार चौकशी

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

लोकप्रतिनिधींना येणा-या धमक्या ( threats ) आणि लोकप्रतिनिधींवर होणा-या हल्ल्यांची चौकशी ( Inquiry into the attacks on peoples representatives ) करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) प्रमुखपदी सहपोलिस आयुक्त मिलिंद भारंबे ( Joint Commissioner of Police Milind Bharambe – SIT )यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाचा अहवाल तीन महिन्यात राज्याच्या गृह विभागाला सादर होईल.

- Advertisement -

लोकप्रतिनिधींना येणा-या धमक्यांचा मुद्दा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात गाजला होता. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (State Environment Minister Aditya Thackeray ) यांना मध्यंतरी धमकी आली होती. आदित्य ठाकरे यांना धमकी देणा-या जयसिंग राजपूतला बंगळूरू येथे अटक झाली होती. हा मुद्दा शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. लोकप्रतिनिधींना येणा-या धमक्या आणि होणा-या हल्ल्यांचा सर्वच पक्षाच्या आमदारांनी निषेध केला होता.

त्यावर राज्यातील लोकप्रतिनिधींना आलेल्या धमक्यांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकामार्फत(एसआयटी) चौकशी करण्यात येईल. धमक्या रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या संदर्भात निश्चित धोरण आखले जाईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. त्यानुसार एसआयटीच्या प्रमुखपदी मिलिंद भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या तपास पथकामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून तज्ज्ञ व्यक्तींना बोलावण्याचे अधिकार मिलिंद भारंबे यांना दिले आहेत. एसआयटीसाठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याचे अधिकारही त्यांना दिले आहेत. राज्यातील लोकप्रतिनधींना आलेल्या धमक्या तसेच त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यांचा आणि दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा आढावा हे पथक घेईल.

अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तातडीने करायच्या उपाययोजना तसेच कार्यवाहीबाबत शिफारस करण्याची जबाबदारी एसटीआयटीवर सोपवण्यात आली आहे. विशेष तपास पथकांने चौकशीची कारवाई तीन महिन्यात पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना गृह विभागाने जारी केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या