Saturday, April 27, 2024
Homeराजकीयकाँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल

काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल

नवी दिल्ली –

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी मंगळवारी

- Advertisement -

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. पटोले यांनी आपल्याला मंत्रिपद द्यावे अशी मागणी केली होती. त्यामुळे काँग्रेस हायकमांडकडून राज्यात खांदेपालट केली जाण्याची शक्यता आहे.

नितीन राऊत यांच्याकडे असलेले ऊर्जा खाते हे नाना पटोले यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. जर ऊर्जा खाते नाना पटोले यांना देण्यात आले तर नितीन राऊत यांनी नवीन जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. मध्यंतरीच्या काळात वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून नितीन राऊत यांनी टीकेचा सामना करावा लागला होता. त्यामुळे हे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे काँग्रेसच्या काही नेत्यांनी राज्यात उपमुख्यमंत्रिपद हे काँग्रेसला द्यावे असा सूर लगावला होता. परंतु, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी याला नकार दिला होता. मात्र, राहुल गांधी यांनी सुद्धा राज्यात सत्तेत बरोबरीचे स्थान मिळावे अशी भूमिका सुरुवातीपासूनच मांडली आहे. आता सुद्धा त्यांनी समान वाटप कार्यक्रमाबाबत चर्चा केल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या