Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयजलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीला अडचण नाही!

जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीला अडचण नाही!

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

जलयुक्त शिवारमध्ये ( Jalyukta Shivar Yojana ) झालेल्या साडेसहा लाख कामांपैकी ९५० कामांविषयी तक्रार आहे. ही संख्या फार मोठी नाही. खरेतर कोणत्याही कामात चूक होऊ नये या मताचा मी आहे. तरीही जलयुक्त शिवारच्या कामात चूक झाली असेल तर त्याची चौकशी करण्यात अडचण नाही, असे स्पष्टीकरण विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis ) यांनी गुरुवारी केला.

- Advertisement -

मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार योजना राबवली होती. या योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने चौकशी समिती नेमली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार आता जलयुक्त शिवार योजनेतील कामाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी जलयुक्तच्या चौकशीला अडचण नसल्याचे सांगितले. आमचे सरकार असताना आम्ही जलयुक्तच्या ६५० कामांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते, अशी माहितीही त्यांनी दिली. या योजनेच्या संदर्भात सरकारला जी चौकशी करायची असेल ती त्यांनी निश्चितपणे करावी, असेही फडणवीस म्हणाले.

जलयुक्त शिवार योजनेचे सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या योजनेचे काम कृषी, जलसंधारण, ग्रामविकास, लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद अशा सात विभागाच्या माध्यमातून झाले. योजनेचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाला जात होता आणि तेथूनच त्याचे वितरण होत होते, असेही फडणवीस यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या