...तर खा.लोखंडेंना मोत्याची टोपी
राजकीय

...तर खा.लोखंडेंना मोत्याची टोपी

प्रसिद्धी मिळविण्याचा खासदार लोखंडे यांनी केविलवाणा प्रयत्न करू नये असा टोला ही डॉ.ढगे यांनी लगावला आहे.

sukhdev fulari

sukhdev fulari

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

अरबी समुद्राला जाऊन वाया जाते ते पाणी गोदावरी खोऱ्यात आणल्यास खासदार सदाशिव लोखंडे यांना आपण मोत्याची टोपी घालून त्यांचा सन्मान करू अशी प्रतिक्रिया कृषी शास्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी व्यक्त केली.

उत्तर नगरचे (शिर्डी) खासदार सदाशिव लोखंडे यांनी भंडारदरा धरणाचे जलपूजन प्रसंगी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरुन समुद्रात वाहून जाणारे 165 टीएमसी पाणी अडवल्यास नाशिक, नगरसह मराठवाड्याचा पाणीप्रश्न कायमचा सोडवता येणे शक्‍य आहे.यासंदर्भात राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यास अधिक गती देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक घेण्याबाबत आपले प्रयत्न आहेत असे भाष्य केले होते.

त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना डॉ. ढगे म्हणाले,सह्याद्री घाट माथ्यावरची 165 टीएमसी पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात आणणार असल्याचे आश्वासित केल्याचे वाचून मनस्वी खूप आनंद झाला. खासदार लोखंडे यांनी महत्त्वाच्या व ज्वलंत प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्यामुळे अभिमान वाटला. घाटमाथ्यावर भरपूर पाऊस पडतो ते सर्व पाणी अरबी समुद्राला जाऊन वाया जाते. ते पाणी गोदावरी खोऱ्यात आणल्यास नाशिक नगर विरुद्ध मराठवाडा हा संघर्ष कायमचा मिटला जाईल. हा संदर्भीय पाण्याचा प्रश्न त्यांच्या खासदारकीच्या काळात सोडविल्यास दुष्काळी जनता त्यांची खूप ऋणी होईल. विशेषतः मी व्यक्तिशः त्यांना मोत्याची टोपी घालून आदरपूर्वक सन्मान करील.

मात्र त्यांचे हे वक्तव्य केवळ पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी असावे, त्यातून प्रसिद्धी मिळविण्याचा खासदार लोखंडे यांनी केविलवाणा प्रयत्न करू नये असा टोला ही डॉ. ढगे यांनी लगावला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com