मेहबूब शेख-चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध विकोपाला

मेहबूब शेख-चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध विकोपाला

अहमदनगर | Ahmednagar

आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांच्यावर पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे (Parner Tehsildar Jyoti Devre) यांनी केलेल्या आरोपानंतर, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (bjp Chitra Wagh) यांनी आक्रमक भूमिका घेत लंकेंवर आरोप केले होते.

मेहबूब शेख-चित्रा वाघ यांच्यातील शाब्दिक युद्ध विकोपाला
आता स्वस्तात करता येणार AC चा प्रवास

त्यांनतर, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (NCP Mehebub Shaikh) यांनी वाघ यांना सडेतोड उत्तर दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी वाघ यांच्यावर फेसबुकवरून जहरी टीका केली असून, त्यावर वाघ यांनी देखील ट्विट करून जोरदार पलटवार केल्याने, या नेत्यांच्यात सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले असल्याचे पाहायला मिळत आहे.

एका कार्यक्रमात वाघ यांनी केलेल्या लंकेवरच्या आरोपाला उत्तर देताना शेख यांनी म्हंटल होत की, 'अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली. महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय?, राष्ट्रवादी पक्षच महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आधी आपल्या घरात नीतिमत्ता शिकवा', असा पलटवार त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला. तसेच, 'तुमच्या-माझ्या सारख्या कार्यकर्त्याला चित्रा वाघ नीतिमत्ता शिकवायला निघाल्या आहेत. आधी तुमच्या नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा. तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते, असं सांगायला देखील शेख विसरले नाहीत. मेलेल्या मढयावरचं लोणी खाणारी तुमची अवलाद, तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवताय, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवला. तुमच्या नवऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली, हे मी नाही बोलत तर एसीबीचा रिपोर्ट आहे, असं शेख म्हणाले आहेत.

दरम्यान शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केल्यानंतर वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'मी वाघ आहे वाघ, माझ्यावर कोल्हे कुत्रे भुंकत आहेत. पण मी कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही, अशा शब्दात त्यांनी शेख यांच्यावर पलटवार केला. चित्रा वाघ यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, वाघावर कोल्हे कुत्रे भुंकताहेत. कारण मी पीडितांच्या पाठीशी उभी राहते. सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले. आता माझ्या परिवाराची बदनामी सुरू आहे. मी काय आहे, काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या. वाघ आहे मी लक्षात ठेवा. कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही, असं वाघ यांनी म्हटलं आहे.

आता पुन्हा एकदा मेहबूब शेख यांनी वाघ यांच्यावर फेसबुकवरून जहरी टीका केली असून, आडनाव वाघ असल्याने कोणी वाघ होत नाही, आणि बाप बदलणारे तर आम्ही मुळीच नाही. डायलॉगबाजी सोडा आणि आपल्या नवऱ्यावर ५ जून २०१६ ला कारवाई झाली तेव्हा सरकार कुणाचं होतं ते सांगा? त्यांनी कोणत्या बुध्दीने कारवाई केली होती याचं उत्तर द्या. तुम्ही काय आहात हे आम्ही पाहिलंय. कुणाला विचारायची आवश्यकता नाही, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलंय की, जसं आम्ही म्हणतो की आमची नार्को टेस्ट करा, तसं तुम्हीही म्हणा की नवऱ्याची पण नार्को टेस्ट करा कर नाही त्याला डर कशाला. भुंकतंय कोण हे महाराष्ट्र बघतोय. आणि मी पण बाप बदलणाराच्या बापाला पण भीत नाही, असं मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com