Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्या...अखेर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात

…अखेर राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात

मुंबई | Mumbai

राज्याचे आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत (Budget session) राज्य सरकारकडून (State Government) घोषणा करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे…

- Advertisement -

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात (Nagpur) घेतले जावे, अशी मागणी जोर धरत आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) हे नागपूर ऐवजी मुंबईत (Mumbai) होत असल्याने ही मागणी सातत्याने होत होती. विधिमंडळ कामकाज समितीची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीत आगामी अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली.

ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून अधिवेशन नागपुरात होत नसल्याने विरोधी पक्ष नेत्यांकडून टीकाटिप्पणी सुरू होती. शिवाय काँग्रेसकडूनही नागपुरात अधिवेशन व्हावे, अशी मागणी केली गेली.

अखेर ही मागणी आता मान्य झाली आहे. त्यामुळे राज्याच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाला २८ फेब्रवारी रोजी नागपुरात सुरुवात होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या