Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला

राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला

मुंबई | Mumbai

येथील गोरेगाव परिसरात मनसेच्या (MNS) नव्या शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी राज ठाकरे (Raj Thackeray) उपस्थित असलेला स्टेज अचानक कोसळला आहे. यात सुदैवाने राज ठाकरे यांना कुठलीही दुखापत झाली नाही.

- Advertisement -

राज ठाकरेंचे सुरक्षा रक्षक, पोलीस आणि कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाने राज ठाकरेंना कुठलीही दुखापत झाली नाही.

शिवजयंतीच्या (Shiv Jayanti) पार्श्वभूमीवर मुंबईत आज चांदिवली (Chandivali) आणि गोरेगाव (Goregaon) येथे मनसेच्या (MNS) नव्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते पार पडले. त्यांना पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती.

गोरेगाव येथील कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर कार्यालयाच्या स्टेजचा पुढील भाग कोसळला. त्यावर राज ठाकरे, बाळा नांदगावकर, यांच्यासह मनसेचे इतर नेतेदेखील उपस्थित होते. स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्ते आल्याने स्टेजचा पुढील भाग कोसळला.

- Advertisment -

ताज्या बातम्या