शिंदे गट राजकीय पक्ष नाही; ठाकरे गटाच्या वकिलांचा दावा

शिंदे गट राजकीय पक्ष नाही; ठाकरे गटाच्या वकिलांचा दावा

मुंबई | Mumbai

आज शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाणबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी (Election Commission India) होत आहे. आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) यांनी शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही असा दावा केलेला आहे....

याधीच्या सुनावणीत उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख नाहीत, असा युक्तीवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला होता. यानंतर आता ठाकरे गटाच्या वकिलांनी त्यांच्या या युक्तीवादावर पलटवार केला आहे...

शिवसेना (Shivsena) पक्षात फूट म्हणता येणार नाही. शिंदे यांनी लोकशाहीनुसार म्हणणे मांडायला हवे होते. मात्र, ते गुवाहाटीला निघून गेले. पक्षाने बोलावलेल्या सभेत शिंदे गट उपस्थित नव्हता. यामुळे शिंदे गट हा राजकीय पक्ष नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला आहे.

शिंदे गट राजकीय पक्ष नाही; ठाकरे गटाच्या वकिलांचा दावा
संतापजनक! महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहावर अत्याचार

ठाकरे गटाकडून दोन अर्ज दाखल झाले. प्रतिनिधी सभा तसेच नेता निवडीसाठी अर्ज दाखल केले. राष्ट्रीय कार्यकारिणी आमच्यासोबत आहे. पक्षप्रमुख निवड राष्ट्रीय कार्यकारिणीत होऊ शकते. प्रतिस्पर्धी गट असल्याचा पुरावा शिंदे गटाकडे नाही.

शिंदे गट राजकीय पक्ष नाही; ठाकरे गटाच्या वकिलांचा दावा
काय सांगता? 18 लाखांचा 'चोरी'स गेलेला रस्ता शोधण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांचे पथक जंगलात

ठाकरेंची कार्यकारिणी ही घटनेप्रमाणे आहे. यामुळे ठाकरे गट कार्यकारिणी बरखास्त होऊ शकत नाही. शिंदेंची राष्ट्रीय कार्यकारिणी बेकायदेशीर असून एकनाथ शिंदेंची निवड देखील बेकायदेशीर असल्याचा दावा सिब्बल यांनी केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com