साकीनाका घटनेतील नराधमांना कठोर शिक्षा व्हावी - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

साकीनाका घटनेच्या निषेधार्थ पवईत मोर्चा
साकीनाका घटनेतील नराधमांना कठोर शिक्षा व्हावी - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

सरकारमधील तीन पक्ष सांभाळणे हाच महाविकास आघाडी सरकारचा Mahavikas Aaghadi प्राधान्यक्रम असल्यामुळे महिला सुरक्षा Women's safety त्यांनी वाऱ्यावर सोडली असून पोलिसांनाही काम करणे कठीण झाले आहे. पोलिसांचा धाक आणि दरारा कमी झाला असून वाझेंसारख्या प्रवृत्ती डोके वर काढत आहेत, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar यांनी रविवारी केली.

साकीनाका घटनेतील Sakinaka incident विकृत नराधमांना तत्काळ कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मुंबई भाजप महिला आघाडीच्यावतीने Mumbai BJP Women's Front आज पवई पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सरकारवर टीका केली.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रतिनिधींनी सुद्धा घटनास्थळाला भेट दिली. त्यांनीही महाविकास आघाडी सरकारच्या महिला सुरक्षा व्यवस्थेबाबत नापसंती व्यक्त केली. राज्यातील महिलांप्रती राज्य सरकार कमालीचे असंवेदनशील असल्यामुळे गेली दोन वर्षे राज्य महिला आयोगावर नेमणुका सरकारने केल्या नाहीत. महिला आयोगावरील नेमणुकांची फाईल उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांकडे गेल्यानंतर ते सही करत नाहीत. यावरून महाविकास आघाडी सरकार महिला सुरक्षेबाबत किती गंभीर आहे हे दिसून येते, असे दरेकर म्हणाले.

मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी बलात्काराच्या घटनेनंतर "आम्ही कुठेकुठे पोलीस ठेऊ ?", असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना दरेकर म्हणाले, मुंबई पोलीस दलाचे प्रमुखच जर अशा प्रकारे हतबलता दाखवत असतील तर पोलीस दलाने काय कारायचे ? पोलीस दलामध्ये ऊर्जा निर्माण करून महिला सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचा संदेश देण्याऐवजी पोलीस आयुक्त हतबलता व्यक्त करीत आहेत. हे अतिशय लाजिरवाणे आहे, अशी खंत दरेकर यांनी व्यक्त केली.

सरकारच्या नाकर्तेपणामुळेच सरकारला शरम आणणारी घटना साकीनाक्यात घडली आहे. आतातरी सरकारने डोळे उघडून महिलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. जोपर्यंत सरकार महिला सुरक्षेबाबतचा ॲक्शन प्लॅन महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवणार नाही तोपर्यंत भाजप महिला आघाडी राज्यभर आंदोलन करील, असा इशाराही दरेकर यांनी दिला.

यावेळी आमदार मनीषा चौधरी, मुंबई महिला मोर्चाच्या अध्यक्षा नगरसेविका शीतल गंभीर, नगरसेवक सुशम सावंत, जतीन देसाई आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com