Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यापुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच! पटोलेंच्या ट्विटने नव्या चर्चांना उधाण

पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच! पटोलेंच्या ट्विटने नव्या चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai

गेल्या काही निवडणुकांमध्ये (Assembly Election Results) देशभरात काॅंग्रेस (congress) पराभवाला सामोरे जात आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांत काॅंग्रेसला मोठे अपयश आले. याच दरम्यान काँग्रेस महाराष्ट्र (Maharashtra Congress) प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज पुन्हा एक वाक्य ट्वीट करत खळबळ उडवून दिली आहे.

- Advertisement -

‘२०२४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच सर्वाधिक जागा मिळवील. पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल’ असं नाना पटोले यांनी ट्विट करत म्हंटल आहे. नाना पटोलेंच्या या दाव्याने वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (Nana Patole Tweet)

दरम्यान,’जनतेचा कौल काँग्रेस पक्षाला मान्य आहे. आम्ही कुठे कमी पडलो, याचे आम्ही आत्मचिंतन करु आणि जनतेचे प्रश्न घेऊन पुन्हा नव्या उमेदीने सामारे जाऊ, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक निकालानंतर दिली होती. त्यानंतर, रविवारी काँग्रेस कमिटीची वरिष्ठ नेत्यांसमवेतची दिल्लीत (Delhi) बैठक झाली. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस पक्षाने एल्गार पुकारल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या