Wednesday, May 8, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या वृत्ताने राज्यभर मिळाली प्रसिध्दी

राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या वृत्ताने राज्यभर मिळाली प्रसिध्दी

जळगाव । प्रतिनिधी Jalgaon

आपल्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत कुणी कोणते फोटो द्यावे. हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. आपले सर्व पक्षांमध्ये चांगले संबंध असले तरी आपण भाजप पक्षाशी एकनिष्ठ आहोत.

- Advertisement -

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस मधील प्रवेशाच्या वृत्ताने आपल्याला राज्यभर चांगली प्रसिध्दी मिळाली, अशी गुगली टाकत पक्षांतराबाबत सुरू असलेल्या चर्चेला भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी पूर्णविराम दिला. शनिवारी जळगाव भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्र शासनाकडून मागासवर्गियांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती बंद करण्यात येत असल्याची चर्चा सध्या सुरू असून या प्रकरणी राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात भाजपच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट करण्यासाठी शनिवारी भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात माजी पालकमंत्री तथा भुसावळचे विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विधानक्षेत्र प्रमुख दीपक साखरे, प्रसिध्दी प्रमुख मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.

आमदार सावकारे पुढे म्हणाले की, केंद्र सरकारने मागासवर्गियांची शिष्यवृती बंद केली, असा आरोप काँग्रेसचे खा.राहुल गांधी यांच्यासह अन्य नेत्यांनी केला होता. मात्र, मागासवर्गियांच्या स्कॉलरशीपमध्ये केंद्राचा 60 तर राज्य सरकारचा 40 वाटा असून याला बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आमदार सावकारे हे राष्ट्रवादीच्या मार्गावर असून त्यांच्या वाढदिवसाला समर्थकांनी भाजपचे चिन्हा कमळ टाकले नव्हते.

तसेच माजीमंत्री गिरीश महाजन यांचा फोटो जाहिरातीत नसल्याकडे पत्रकारांनी लक्ष वेधून घेतले. त्यावर आमदार सावकारे म्हणाले की, मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. माझे प्रत्येक राजकीय पक्षात चांगले संबंध आहेत. मी स्वत: वाढदिवसाला जाहिरात दिलेली नव्हती. त्यामुळे इतरांनी काय टाकावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी स्वत: दिलेल्या जाहिरातीत हा प्रकार नव्हता. यामुळे माझ्याबाबत दिलेल्या बातम्यांमुळे मला खरं तर राज्यभर चांगली प्रसिध्दी मिळाली, असे सांगून आमदार सावकारे यांनी पक्षात्तरांच्या विषयाला पूर्णविराम दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या