शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सरकार कटिबद्ध

jalgaon-digital
4 Min Read

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

गेल्या पावणे दोन वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र Maharashtra State करोनाशी Corona लढत असून सध्या आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना देण्यात येणारे अनुदान Subsidy to farmers देण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांनी शुक्रवारी विधानसभेत प्रश्नोतारच्या तासात दिले.

महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेंतर्गत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत आमदार प्रकाश आबिटकर, डॉ. संदीप धुर्वे यांनी प्रश्न विचारला होता.

शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. गेल्या दोन वर्षांत कोविडमुळे राज्याची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. लॉकडाऊनमुळे एक ते दीड लाख कोटींचे उत्पन्न घटले. आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्यात येणार आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.

कर्ज वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी निर्णय घेतले होते. दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी‌ तर दोन लाखाच्यावर कर्ज असणाऱ्यांनी वरच्या‌ कर्जाची परतफेड केल्यास त्यांनाही दोन लाखांची माफी आणि ज्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली अशा शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

या योजनेतंर्गत ३१ लाख ८१ हजार शेतकऱ्यांना पात्र ठरवत २० हजार २९० कोटींचे वाटप करण्यात आले आहे, अशी माहितीहि पवार यांनी दिली. काही शेतकऱ्यांना पुरवणी मागण्यात तरतूद केल्याप्रमाणे मदत मिळेल. तर उर्वरित सर्व शेतकऱ्यांना पुढील अर्थसंकल्पात मदत जाहीर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा : वडेट्टीवार

शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या स्मार्ट योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालबद्ध आराखडा तयार करण्यात येईल, असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. स्मार्ट योजनेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, कुणाल पाटील, समीर कुणावार यांनी प्रश्न विचारला होता.

शेतकऱ्यांना देण्यात येणारे गट शेती थकित अनुदान याबाबत ही लवकरच निर्णय घेण्यात येईल. दोन वर्षांपूर्वी शासनाने शेतकऱ्यांना २० हजार कोटी रुपयांची कर्ज माफी दिली होती. यामध्ये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

याची अंमलबजावणी करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे. तेलंगणा राज्यात ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्यात येते त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल याचा अभ्यास कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्यासमवेत स्वत: करणार असून याचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर करण्यात येईल, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरुन पाठपुरावा सुरु : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासंदर्भात क्षेत्रीय स्तरावरुन पाठपुरावा सुरु असल्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. हिंगोली तालुक्यातील सेनगाव तालुक्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँककेडून दुर्लक्ष होत असल्याबाबतचा तानाजी मुटकुळे, प्रशांत बंब, प्रकाश सोळंके यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना पाटील म्हणाले, बँकाकडून शेतकऱ्यांना पुनर्गठन आणि पीककर्ज देण्यास दुर्लक्ष होत नाही. सन २०२१-२२ च्या खरीप हंगामात सेनगांव तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांनी एकूण १६ हजार शेतकऱ्यांना ९७७ .८६ लाख कर्ज वाटप केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *